सरफराज खान पठाण
शहर प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती : गोवंश तस्करी आणि गाईच्या हत्येमध्ये (बैल, रेडा, गोरा ) गुंतलेल्यांवर मकोका कायदा अंतर्गत दोषींवर कारवाई करन्याचे महाराष्ट्र सरकारने विधानसभेत बहुमताने मंजुरी दिली आहे.मकोकामध्ये जामीन तेव्हाच मंजूर केला जाऊ शकतो जेव्हा विशेष मकोका कोर्टाला खात्री पटली पाहिजे की,आरोपी गुन्ह्यात दोषी नाही.जामीनावर सुटल्यानंतर तो पुन्हा गुन्हा करणार नाही. हे सिद्ध करण्याची जबाबदारीही आरोपींवर असेल,जी अत्यंत अवघड आहे.यामध्ये किमान शिक्षा पाच /पाच वर्षे तुरुंगवास आणि कमाल शिक्षा जन्मठेपेची आहे, म्हणजे जन्मठेप आणि दंडही होऊ शकतो. मकोकामध्ये अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. म्हणजे अटकपूर्व जामिन घेता येत नाही. इतर कायद्यांमध्ये आरोपपत्र 90 दिवसांच्या आत दाखल करावे लागते, तर मकोका मध्ये ते 180 दिवसांपर्यंत असू शकते. या कालावधीत जामिन मिळणे कठीण आहे.कायद्याची अंमलबजावनी सुरु झाल्यापासुन गोवंश हत्या करनाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहे.


