योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील
तळोधी (बा.) येथील सामाजिक कार्यकर्ता प्रकाश भाऊराव बारसागडे हा तरूण मागील काही महिन्यापासून कॅन्सर या आजाराने व्याधीग्रस्त आहे. या बाबीची माहिती कळताच चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गटनेता डॉ. सतीश वारजुकर व सामाजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन प्रकाशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
प्रकाश चा छोटासा सलून व्यवसाय आहे. मात्र त्याला कॅन्सर झाल्यापासून त्याचा व्यवसाय बंद पडला आहे. आणि आजार वाढीस लागला आहे. अशावेळी त्याच्याकडे असलेली जमापुंजी उपचारात संपली आहे.आणि ऑपरेशनची वेळ येऊन ठेपली आहे. तो नागपूर येथे भरती आहे. त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने अशावेळी त्याला दानशुरांकडून आर्थिक मदतीची गरज असल्याची बातमी तळोधी पत्रकार संघ,तळोधीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक राजेश बारसागडे यांनी सोशल मीडियावर व वृत्तपत्रात प्रकाशित केली. या घटनेची माहिती होताच, गोर -गरीब जनतेच्या नेहमीच हाकेला धावून जाणारे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेते डॉ. सतीश वारजूकर व सामाजिक कार्यकर्ते दिवाकर निकुरे यांनी प्रकाशच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयाची प्रत्यक्ष भेट घेतली.आणि प्रकाशच्या पत्नीला आर्थिक मदत केली. व जिल्हा परिषद च्या माध्यमातून सुद्धा लवकरच मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष विलास लांजेवार, ग्रा. पं. सदस्य डोनू पाकमोडे, मोनील देशमुख, काँग्रेस कार्यकर्ते बंडू गेटकर, पुसोत्तम पराते, सोनू कटारे, तुकाराम लोणबले, महेश काशीवर, सुवास कटकमवार गोविंदा दाणे आदींची उपस्थिती होती.