योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.)येथील सामाजिक कार्यकर्ता असलेला युवक प्रकाश भाऊराव बारसागडे हा मागील काही दिवसांपासून कॅन्सर या कष्टदायक रोगाने ग्रस्त आहे.त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्याच्यावर अवघ्या काही दिवसात नागपूररातील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे.तरी दानशूरांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
कुठल्याही सामाजिक कार्यासाठी पुढे राहणाऱ्या प्रकाशची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने पुढे काही दिवसात होणाऱ्या कॅन्सर वरील शास्त्रक्रियेसाठी त्याच्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रियेसाठी अडचण निर्माण होणार आहे. आतापर्यन्त जेवढे पैसे गाठीशी होते ते उपचारासाठी संपलेले आहे. मात्र आजारातूम बरे होता आले नाही. आणि कॅन्सर हा अतिशय कष्टदायक आजार दिवसांदिवस वाढत जात आहे. त्यामुळे तो करीत असलेला सलून व्यवसायही बंद पडलेला आहे. आणि कुटुंबाची जगण्यासाठी धडपड सुरु असताना उपचाराला पैसे आणायचे कुठून?असा जीवघेणा प्रश्न प्रकाश व त्याच्या कुटुंबीयांपुढे उभा ठाकला आहे. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी प्रकाशच्या कॅन्सर आजराच्या शस्त्रक्रियेसाठी सरळ हाताने आर्थिक मदत करावी. मदतीसाठी (7030985085)या भ्रमणध्वनीवर थेट संपर्क करावा. किंवा भारतीय स्टेट बँकेच्या, खाता क्रमांक 34796376587 (आय एफ एस सी कोड:एसबीआयएन 0004712 )या खात्यावर आर्थिक मदत जमा करावी.असे आवाहन प्रकाशच्या मित्रपरिवाराने केले आहे.