तारा पाटील
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : पालघर जिल्ह्यातील नालासोपारा, वसई आणि बोईसरच्या निवडणूकीत राजकीय खळबळ उडवून देणारा निर्माण घेण्यात आला आहे. गेल्या सात वर्षापासून भाजपासोबत असलेल्या कुणबी सेनेने आता अचानक बहुजन विकास आघाडीला साथ देण्याचे केले आहे. कुणबी सेनेचे नेते विश्वनाथ पाटील यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले आहे. विश्वनाथ पाटील यांनी माध्यमांनी संवाद साधताना सांगितले की, “भाजपासोबत सात वर्षे राहुन ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अपेक्षित परिणाम झाला असल्याचे दिसून येते नाही. आघाडी बरोबर निवडणूकीत उतरण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांच्या हितासाठी एकत्र येण्याचे ध्येय उराशी बाळगत कुणबी सेनेने बहुजन विकास आघाडी सोबत हात मिळवणी केली आहे. या पुढेही सोबतच राहणार असल्याचे कुणबी सेना अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी सांगितले. या बदललेल्या समीकरणामुळे आगामी निवडणुकीत नवा रंग भरला जाणार आहे.