प्रशांत मुनेश्वर
शहर प्रतिनिधी नांदेड
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विविध पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्वच पक्ष आपली भूमिका जाहीर करत आहेत . तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून देखील विविध उमेदवार देण्यात येत आहे, अस असतानाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील विविध उमेदवारांना उमेदवारी जाहीर केली.
शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. बालाजी कल्याणकर हे नांदेड शहर परिसरातील परिचित व्यक्तिमत्व असून सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. नांदेड वाघाळा महानगरपालिकेत नगरसेवक पदावर कार्यरत असलेल्या बालाजी कल्याणकर यांनी २०१९ मध्ये विधानसभेत विजय मिळवत मुंबई गाठली होती. २०२४ च्या तिकीट जाहीर झाल्यानंतर नांदेड शहर परिसरात व नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रात त्यांच्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या आहेत.








