शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : दि.19 नाशिक येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी करण्या त येणाऱ्या मराठवाडा भूषण पुरस्काराचे मानकरी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे यांचा सत्कार एल . के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूलचे प्राचार्य प्रा. कार्तिक रत्नाला यांनी केले. तसेच प्रॉस्परस पब्ली क स्कूल येथे प्राचार्या सौ. प्रगती क्षीरसागर, शिक्षकवृंद व विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी डॉ. संजय रोडगे आपल्या मनोगतामध्ये सांगत होते की, तालूका सारख्या छोट्याशा गावामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ची शाळा निर्माण केली. मुलांचे भवितव्य चांगले घडवण्यासाठी शाळेत रोबोटिक लॅब इंग्लिश लॅब, राजीव गांधी विज्ञान प्रयोग शाळाउपलब्ध करून दिले. तसेच मुलांनी या सर्व सोयींचा वापर करून भविष्यात मोठी पदवी मिळवावी.अशी अपेक्षा मुलाबद्दल व्यक्त केली. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन सौ. कल्पना भाबट व सारिका ताठे यांनी केले.








