संतोष पोटपिल्लेवार
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- शीलरत्न बुद्ध विहार खापरी तहसील घाटंजी येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करण्यात आले त्या ग्रंथाचा समापन समारंभ दिनांक 18.10.2024 ला करण्यात आला. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून वंदना घेण्यात आली, त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्राचार्य आयु. राहुल पळवेकर साहेब आय.टी.आय. घाटंजी यांचा खापरीतील उपासक-उपासिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यानंतर तीन महिने विहारात सेवा दिल्याबद्दल आयुष्यमान रंजनी देठे व गणेश सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला, तीन महिने ग्रंथाचे वाचन भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस बौद्धाचार्य शामरावजी मुनेश्वर यांनी केले त्यांचाही सन्मान करण्यात आला, बऱ्याच मुला मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले नंतर आयु. विजय सिसले सर यवतमाळ जिल्हा सचिव, बौद्धाचार्य एन. जी. भगत सर, प्रमुख पाहुणे आय.टी.आय. चे प्राचार्य माननीय फळवेकर साहेब यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा घाटंजी तालुका शाखेचे अध्यक्ष आयु. संतोषजी जीवने यांनी अध्यक्षीय भाषण केले, प्रमुख उपस्थितीत कृषी अध्यक्ष प्रकाशजी डोंगरे, माजी श्रामणेर किसनराव कांबळे, उपाध्यक्ष हेमंत बोरकर, केंद्र शिक्षक राहून उंमरे, अनिल मुनेश्वर , रणजीत नगराळे, नंदू मुनेश्वर, जितेंद्र कांबळे, शोभा अलोने, नालंदाताई मुनेश्वर, तानुबाई धोटे, सरिताताई नगराळे, मालती कांबळे, सोन्डवले ताई प्रामुख्याने उपस्थित होत्या, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शामरावजी मुनेश्वर, रंजनजी देठे, तालुका सचिव बंडू सोन्डवले, दीक्षा सोन्डवले, भूमिका सोनवले, शंकर सोन्डवले, रूपाली सोन्डवले, आशा सोनवले, मारुती सोन्डवले, यमुना सोन्डवले, स्वराज सोन्डवले, विकास सोन्डवले, अरुणा सोन्डवले, राहुल सोन्डवले, रवीना सोन्डवले, प्रकृती सोन्डवले, गणेश सोन्डवले, अर्चना कांबळे, विदिशा कांबळे, प्रथमेश कांबळे, गौतम कांबळे, महेश मानकर, माधुरी मानकर, सागर देठे, संध्या देठे, रंजनजी देठे, सुलोचनाताई देठे, नूतन देठे, अजय देठे, शुभम देठे, सुभद्रा वासेकर, शेखर तेलंग, संगीता तेलंग, आदर्श तेलंग, संविधान तेलंग, सचिन तेलंग, सुजाता तेलंग, संबोधी केला, आदित्य तेलंग, राजू तेलंग, योगिता तेलंग, बुद्धांश तेलंग, वैभव तेलंग, महादेव तेलंग, शोभा तेलंग, विलास तेलंग, पपीताताई तेलंग, काजल तेलंग, स्वाती तेलंग, विवेक बनसोड, अंकुश खोंडे, नम खोंडे, अलका जगताप, सुरेश खोंडे, सम्यक जगताप, जनार्दन भगत, अनुसयाबाई वानखेडे, रोशनी धोपटे, प्रफुल धोपटे, तक्ष धोपटे, रक्षा गावंडे, ओम टिपले, वैशाली टिपले, सौरभ घुले, संघर्ष घुले, प्रतुशा शेडमाके, फुलाबाई मानकर, श्रावणी कनाके, मानकर या सर्व बौद्ध उपासक उपासिका यांचे सहकार्य लाभले, संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन भूमिका सोन्डवले, प्रास्ताविक बंडूची सोन्डवले व आभार रंजन देठे आणि बंडोजी सोन्डवले यांनी केले. शेवटी भोजनदान आणि खीरदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








