स्वरूप गिरमकर
ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : आज काल वाढदिवस म्हटला कि केक,फटाक्याची अतिषबाजी, दारू पीणे, डिजे लाऊन नाचणे, हॉटेल मध्ये पार्टी देणे असे अनेक प्रकारे पैसा खर्च केला जातो. ह्या सर्व गोष्टीला फाटा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष सुनील गव्हाणे तसेच पिंपळगावच्या ग्रामपंचायत सदस्य नंदिनीताई चौधरी यांचा वाढदिवस तळेगाव ढमढेरे येथील आनंद आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात झाला. येथील मुलांना शालोपयोगी वस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचा खर्च व्यर्थ आहे.घरच्यांच्या मतानुसार वाढदिवसाचा खर्च वाया न घालविता तो कोणाच्या तरी उपयोगी यावा.या संकल्पनेतून आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा केला, अशी भावना सुनिल गव्हाणे आणि नंदिनीताई चौधरी यांनी व्यक्त केली. यावेळी राहुलदादा करपे पाटील (चेआरमन योगीराज उद्योग समूह ),विजय गव्हाणे (मा. उपसरपंच डींग्रजवाडी ), कामिनिरजे भोसले ताकवले (श. प. राष्ट्रवादी व्यापार उद्योग आघाडी जिल्हा अध्यक्ष) विद्याताई साकोरे (संस्थापक अध्यक्ष शिरूर इंटरनॅशनल स्कूल ),सुनिताताई आंधळे (पोलिस अधिकारी ) सामाजिक कार्यकर्त्या नंदिनीताई चौधरी,आसिफभाई तांबोळी (श. प. शिरूर तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष) गोसावी सर मुख्याध्यापक, प्रदीप बहिरससाने (सामाजिक कार्यकर्ते),राहुलदादा चौघुले (महाराष्ट्र चॅम्पियन ),भरतसर खुडे शिव व्याख्याते, विनायकबाप्पू करपे (संचालक योगीराज उद्योग समूह) ,उमेशशेठ दरवडे सरपंच कोंढापुरी,भाऊसाहेब चकोर सरपंच दरेकरवाडी, सोहेल पठाण सा.का.यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले समाजाच्या गरजा ओळखून आवश्यक मदत करण्याचे हे काम पूर्णतः समाजाच्याच पाठिंब्यावर चालते.. ‘अनाथांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा’ असते. आनंद आश्रम शाळेत एकूण २५० विद्यार्थी असून १२० विद्यार्थ्यांचे मानधन फक्त प्रशासनाकडून मिळते. बाकी विद्यार्थ्यांना सामाजिक देणगीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तरुणांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अशा संस्थांना मदत करणे गरजेचे आहे.








