गावाकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातूर :- पातूर तालुक्यातील कोठारी बु तेथील दलित वस्ती सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत सदर बांधकाम हे माती मिश्रित रेती, सिमेंट, व रेती एवजी गिट्टी चा वापर सुरु आहे तशेच सदर बांधकाम इस्टीमेन्ट नुसार होत नाही आहे बांधकाम अल्पवधीत पडून गावाची मोठया अपघाताची शक्यता आहे सदर कोठारी बु तेथील दलित वस्ती सभागृहाची पाहणी संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली असून पुढे काय निर्णय देतात या कडे गावाकऱ्याचे लक्ष लागले आहे यावेळी प्रवीण भारसाकळे, मनोहर कांबळे, अनिल कांबळे, कैलास भारसाकळे, संभाजी भारसाकळे, नितेश माणिक भारसाकळे भास्कर भारसाकळे यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत.


