सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
हिवरा आश्रम,..विद्यार्जनासारखे पवित्र व आनंददायी सुख नाही. विद्यार्जनामुळे माणसाच्या वैचारीक प्रगल्भतेत वाढ होते. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी व प्रयत्नाची पराकाष्ठा यामुळे कोणतेही यश सहज प्राप्त करता येते. विद्यार्थ्यांनो आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करा आपल्या आजूबाजूलाही अणेक यशस्वी व सफल लोक असतात
असे प्रतिपादन विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य के.डी.पाटील यांनी शुक्रवारी ता. २३ रोजी केले. निष्काम कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित पदवीदान समारंभ प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद, संत गाडगे बाबा, कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य के.डी.पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आश्रमाचे कार्यकर्ते सुभाष गणगणे, डॉ.धांडे तथा आदि उपस्थित होते. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम सारख्या खेडयात शिक्षणाचे मोठे दालन निर्माण केले. या शैक्षणिक संकुलाचा आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना लाभ झाला. विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पदवी वितरण समारंभात 32 विद्यार्थ्यांना विज्ञान स्नातकाची पदवी प्रदान करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेवून तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करून पदवीदान समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. मनोज मुऱ्हेकर, प्रा. समता कस्तुरे, प्रा. गजानन गायकवाड, प्रा. अमोल शेळके, प्रा. किशोर गवई, प्रा. मधुरा सातपुते ,सौरभ आंबेकर,प्रा. अरुण फाजगे, प्रा. अमोल मेटांगळे,प्रा. स्वाती परमाळे, प्रा. नितीन धांडे, प्रा. सागर म्हस्के, प्रा. ज्ञानेश्वर गाडे, प्रा. डी. एन. पवार यांनी अथक प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयप्रकाश सोळंकी तर सूत्रसंचालन प्रा.मनिषा कुडके तर आभार प्रदर्शन प्रा.समता कस्तुरे यांनी मानले.