अमोल बावनकार लोकनियुक्त सरपंच येणोली माल यांचा आरोप.
एक वर्षासाठी निलंबित झालेल्या आमदाराच्या हस्ते धनादेशाचे वाटप.
वनविभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी.
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी,चंद्रपुर
चंद्रपुर(११ जुलै) – नागभीड तालुक्यातील ग्राम पंचायत येणोली माल अंतर्गत येणाऱ्या धामणगाव चक येथील एका गरीब महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते त्या गरीब कुटुंबातील व्यक्तीला आज वनविभागाच्या वतीने 4.लाख 80 हजार रु चेक तळोधी बा. वनपरिक्षेत्र येथे आज वाटप करण्यात आला आहे.मात्र सदर चेक हा मृत्यू कुटुंबाच्या घरी वनविभागाच्या वतीने नेऊन देणे अनिवार्य असताना वनाधिकार आपल्या स्व मर्जीने व परस्पर रित्या आज स्थानीक आमदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आला आहे.मात्र सदर धनादेश वाटप करतांना गावातील प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच अमोल बावनकार यांना हेतूपूर्वक वनविभागाच्या अधिकारी वर्गानी डावलले आहे.मात्र एक वर्षासाठी निलंबित असलेल्या आमदार च्या हस्ते मृत्यू कुटुंबातील व्यक्तीला धनादेश देण्यात आला आहे.हे मात्र विशेष आहे.वनविभागाच्या असला हेकेखोर व गलथान कारभाराची चौकशी करून वनपरिक्षेत्र अधिकारी व दोषी असलेल्या वनरक्षक कारवाही करण्याची मागणी सुद्धा सरपंच अमोल बवनकार यांनी केली आहे. सदर प्रकरणाची चौकशी न झाल्यास वनविभागाच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्याचा मानस असल्याचे सरपंच अमोल बावनकार यांनी प्रस्तुत प्रतिनिधी यांच्या जवळ व्यक्त केले आहे.