सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम ला
विवेकानंद आश्रमाच्या वतीने आज सकाळी स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन करण्यात आले. परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर दुर्बलाच्या, वंचिताच्या झोपडी पर्यंत जा. मानवी रूपात कष्ट झेलणारा, वेदना सहन करणारा जीव म्हणजे परमेश्वराचे खरे रूप आहे. त्याच्या वेदनेवर फुंकर घालणे त्याला व्याधीमुक्त करणे हाच खरा परमार्थ होय. असे परिवर्तनशील विचार देणारे व देवाला मंदिरातून मुक्त करून गरीबाच्या झोपडीपर्यंत घेवून जाणारे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद. त्याचा पुण्यतिथी (निर्वाणदिन) विवेकानंद आश्रमात मोठया उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. आज सकाळी स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. परिसर स्वच्छता व विवेकानंद हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना अन्नदान करण्यात आले. तसेच आश्रमात दर्शनास येणाऱ्या प्रत्येक भाविकास वृक्ष दान करण्यात आले. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री यांनी स्वामी विवेकानंदांना आपले अदृश्यातील गुरू मानले होते. स्वामीजींची शिकवण व तत्वज्ञान हे महाराजश्रींचे जीवन ध्येय बनले होते. या अव्दितीय गुरू शिष्यांनी दिलेले जीवनमूल्य आणि विचार विवेकानंद आश्रमाच्या भविष्यातील कार्य कतृत्वाचे अधिष्ठान ठरो. या मंगल कामनेसह स्वामीजींना आश्रमाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. सायंकाळी व्यासपीठावरून भक्तीगीत गायन व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रार्थना व प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.