किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर:: हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या १०८ व्या जयंतीनिमीत्त डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठ अकोला अंतर्गत सुविदे फाउंडेशन द्वारा संचालित कृषि महाविद्याल रिसोड यांच्या वतीने एक विद्यार्थी एक झाड या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

या मोहिमेंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका झाडाचे वृक्षारोपन करुन ते झाड जगविण्याचा संकल्प घेण्याचे आव्हान कृषिदिनानिमीत्त महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कृषि महाविद्यालय येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी अनिकेत अनिल राठोड यांनी ग्रामिण कृषि जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्राम गावंडगांव येथे थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन वृक्षारोपन करुन वृक्ष संगोपनाचा संकल्प कृषिदिनानिमीत्त घेतला आहे. सदर कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एम.अप्तूरकर,यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली तसेच रा.से.यो.अधिकार,विस्तार शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डी.डी.मसुरकर, प्रा.एस.बि.खोडके, प्रा.आर.वाय.सरनाईक यांचे नियोजन व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडला !










