भगवान जाधव
जामखेड सर्कल प्रतिनिधी , अंबड
अंबडतालुक्यातील जामखेड येथील ग्रामपंचायत ने केलेल्या विविध कामाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती अंबड चे विस्तार अधिकारी बी.जे.गुंजाळ यांना निवेदन देऊन पुढील कामाची चौकशी करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले. एक कोटी पंचवीस लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजनेची , केंद्रिय प्राथमिक शाळा जामखेड (पूर्व) / जिल्हा परिषद प्रशाला जामखेड दहा लाख रुपयांची दुरूस्ती निधी , प्राथमिक आरोग्य केंद्र जामखेड , पशुवैद्यकीय दवाखाना , नवीन अंगणवाडी बांधकाम व दुरुस्तीची , पाणीपुरवठा सरकारी विहिरी वरती सौर ऊर्जा पंप 24 लाख रुपयाची ,15 वा वित्त आयोगाचा पैसा खर्च करण्यासाठी परमिशन नसतांनाही ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाची संपुर्ण पणे चौकशी करण्यासंबंधी आज निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन जामखेड ग्रामपंचायत ची संपुर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी नसता उपोषण चा इशारा देण्यात आला आहे.
गटविकास अधिकारी यांचे कार्यालय या ठिकाणी विस्तार अधिकारी गुंजाळ यांना निवेदन दिले असता निवेदनामध्ये अनेक कामांची चौकशी करून कारवाई करणे बाबत म्हटले आहे . तसेच 15 जुलै पर्यंत चौकशी सुरू न केल्यास ग्रामपंचायत कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर उपसरपंचपती फैसल कुरेशी , पंकज मंडलिक, बबन म्हस्के , नवनाथ धुळे , जगन जाधव , दिलावर शेख , ईफ्रान मोमिन आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
अंबड तालुक्यातील जामखेड या ठिकाणी जामखेड ग्रामपंचायतने केलेल्या सर्व कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी नसता 15 जुलै रोजी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्यात येईल










