अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधि मालेगांव
मालेगांव तालुक्या अंतर्गच डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनच्या माध्यमातुन ग्राम डोंगर किन्ही येथे स्थापित कृषि समृद्धी जैविक शेतकरी गटाच्या वतीने आज हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्र राज्यचे मा मुख्यमंत्री स्व वसंतराव नाईक यांची जयंती व कृषी दिन आहे. या पार्श्भूमीवर जैविक शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला जैविक शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा अंतर्गत डोंगर किन्ही येथील प्रगतशील शेतकरी व गटाचे अध्यक्ष डॉ हेमंत देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रंचालन केले तर शिवाजी भारती तज्ञ प्रशिक्षक व क्लस्टर मॅनेजर शंकर शिंदे यांनी शेतकरी वर्गाला जैविक मिशनची संकल्पना, उद्देश व बायोडायनॅमिक शेती तंत्रज्ञान, पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया, शेतकरी उत्पादक कंपनीचा उद्देश व त्या मधून शेतकर्याला होणारे फायदे या विषयी परिपूर्ण आणि मोलाचे मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपस्थीत नंदकिशोर लाहुडकर, मनोज जाधव, निलेश देशमुख, रमेशभाऊ कचोलिया, माणिकराव देशमुख, हिम्मत देशमुख, रघुनाथ गावंडे व गटातील इत्तर सर्व शेतकरी उपस्थीत होते.