हजारो शेतकर्यांना दिलासा:- प्रफुल पटेलांची केंद सरकारकडे पञव्यवहार नंतर योग्य पाऊल.
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत ३० जून रोजी संपली. मात अद्याप पुर्व विदर्भात ८० लाख क्विटंल हून शेतकर्याकडे धान शिल्लक आहे.शेतकर्याचे अडचण लक्षात घेत खासदार प्रफुल पटेलांनी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात उप मुख्यमंञी अजितदादा पवारासह चर्चा करून केंद्राकडे पञव्यवहार केला होता.तदनंतर केंद्रीय अन्न व पुरवठा विभागाने रब्बीतील धान खरेदीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश गुरुवारी (१जुलै) ला काढले आहे.पुर्व विदर्भातील गोंदिया भंडारा ,गडचिरोली,
चंद्रपुर,,नागपूर, या पाच जिल्हात खरिपापाठोपाठ रब्बीहंगाम सुध्दा शासकीय धान खरेदी केली जाते . हमीभावापेक्षा शेतकर्यानी कमी भाव मिळू नये म्हणुन जिल्हयात मार्केटींग फेडरेशन आणि आदि वासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केद्रावरून धान खरेदी केली जाते.मात यंदा मागील खरिप हंगामातील धानाची भरपाईसाठी उचल झाली नव्हती त्यामुळे १ कोटी क्विंटलहून अधिक धान गोदामात तर ४० लाख क्विंटलवर धान्य उघड्यावर पडला होता. त्यामुळे रब्बीतील धान खरेदी केंद्रावर परिणाम झाला होता.गोदाम रिकामे नसल्याने धान खरेदीची प्रक्रिया संथगतीने सुरू होती. त्यामुळे आतापर्यंत केवळ ५ लाख क्विंटल धान खरेदी झाली होती. मोठ्या प्रमाणात उत्पादनात वाढ झाल्याने रब्बीचा धान शेतकर्या कडे घरीच पडून जैसे थे शिल्लक होता.३० जून मुदत संपल्याने धान विक्रीचा प्रश्न ऐरणीवर पडला याची दखल घेत जगाच्या पोशिंद्याला न्याय देण्यासाठी त्यांची आर्थिक कोंडी निर्मान झाल्याचे पाहून विदर्भाचे नेते ,
गोंदिया भंडार्याचे तारणहार खासदार प्रफुल पटेलांनी केंद्राकडे पञव्यवहार करून धान खरेदीची मुदत वाढ मिळविण्यासाठी केंदिय अन्न व पुरवठा सचिवांनी तात्काळ दखल घेत धान खरेदी ला ३१ जुलैपर्यत मुदत वाढ देण्यात येत असल्याचे पञ गुरुवारी काढले. यामुळे पुर्व विदर्भातील शेतकर्यांना दिलासा मिळणार असल्याचे खासदार प्रफुल पटेलांनी म्हटले आहे.










