मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जूनला पदाची शपथ घेतली, यानंतर 39 दिवसांनी 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारामध्ये भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 अशा एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजूनही खातेवाटप झालेलं नाही, तसेच पालकमंत्र्यांचीही घोषणा झालेली नाही.
पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाला जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. सरकारने 35 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करेल, याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांपैकी 19 जिल्ह्यांमध्ये शपथ घेतलेले मंत्री 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतील, याशिवाय उरलेल्या जिल्ह्यांमध्ये तिथले जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.
पाहा यादी…
१) श्री. देवेंद्र फडणवीस – नागपूर
२) श्री. सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
३) श्री. चंद्रकांत पाटील – पुणे
४) श्री. राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
५) श्री. गिरीष महाजन – नाशिक
६) श्री. दादाजी भुसे – धुळे
७) श्री. गुलाबराव पाटील – जळगाव
८) श्री. रविंद्र चव्हाण – ठाणे
९) श्री. मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
१०) श्री. दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
११) श्री. उदय सामंत – रत्नागिरी
१२) श्री. अतुल सावे – परभणी
१३) श्री. संदीपान भुमरे – औरंगाबाद
१४) श्री. सुरेश खाड़े – सांगली
१५) श्री. विजयकुमार गावित – नंदुरबार
१६) श्री. तानाजी सावंत – उस्मानाबाद
१७) श्री. शंभूराज देसाई – सातारा
१८) श्री. अब्दुल सत्तार – जालना
१९) श्री. संजय राठोड – यवतमाळ
२०) विभागीय आयुक्त, अमरावती – अमरावती
२१) जिल्हाधिकारी कोल्हापूर – कोल्हापूर
२२) जिल्हाधिकारी, रायगड – रायगड
२३) जिल्हाधिकारी, बीड – बीड
२४) जिल्हाधिकारी, हिंगोली – हिंगोली
२५) जिल्हाधिकारी वर्धा – वर्धा
२६) जिल्हाधिकारी, गोंदिया – गोंदिया
२७) जिल्हाधिकारी. भंडारा – भंडारा
२८) जिल्हाधिकारी, गडचिरोली – गडचिरोली
२९) जिल्हाधिकारी, अकोला – अकोला
३०) जिल्हाधिकारी, सोलापूर – सोलापूर
३१) जिल्हाधिकारी, लातूर – लातूर
३२) जिल्हाधिकारी. वाशिम – वाशिम
३३) जिल्हाधिकारी, बुलढाणा – बुलढाणा
३४) जिल्हाधिकारी पालघर – पालघर
(३५) जिल्हाधिकारी, नांदेड – नांदेड