दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
औरंगाबाद, दि.24 नाशिक येथील ऑक्सिजन गळतीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील मोठ्या रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था कशी आहे त्याची कार्यप्रणाली कशी चालते याची माहिती घेण्यासाठी आज शुक्रवार दिनांक 23 एप्रिल रोजी, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एमजीएम, डॉ.हेडगेवार व कमलनयन बजाज रुग्णालय येथील ऑक्सीजन प्लांट व फायर प्लांट यांची पाहणी करून तेथील डॉक्टरांना ऑक्सिजन वापराबाबत महत्वाच्या सूचना दिल्या. आज प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्यासोबत जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड व प्रदीप कुलकर्णी यांची एक तज्ञ टीम होती. ही टीम दररोज शहरातील इतर रुग्णालयांना भेट देऊन येथील ऑक्सिजन प्लांट व फायर प्लांट याची पाहणी करणार आहे.
एमजीएम रुग्णालय येथील पाहणी करत असताना तेथे ऑक्सिजनचा टँकर उभा होता. त्यातून ऑक्सीजन टॅंक मध्ये ऑक्सिजन भरण्याचे काम चालू होते. याची बारकाईने पाहणी प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली. टँकर सोबत असलेल्या तंत्रज्ञ कडून सर्व माहिती जाणून घेतली याप्रसंगी एमजीएम चे उप अधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, एच.आर. राघवन, मोहन जाधव, नारायण चौधरी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉ. रेखा भंडारी , अतुल दोड, प्रदीप कुलकर्णी, मनपा जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते. यानंतर मनपा प्रशासक पाण्डेय यांनी डॉ. हेडगेवार रुग्णालयातील ऑक्सीजन प्लांट ची पाहणी केली असता तेथे रुग्णांना मॅन्युअल ऑक्सिजन पुरवठा केला जात असल्याचे दिसून आले तेथे तात्काळ स्वयंचलित यंत्रणा बसवावी अशा सूचना महानगरपालिका आयुक्त पाण्डेय यांनी दिल्या. तसेच त्यांनी या हेगडेवार रुग्णालयातील कोविड वार्डची पाहणी केली. तेथे त्यांना अनेक ऑक्सिजन बेडवर कमी लक्षणे असलेल्या कोविंड पेशंट आढळले व काही पेशंट बेडवर जेवण घेत असताना ऑक्सिजन युनिटचा कॉक चालूच होता असे आढळून आले याबाबत त्यांनी वॉर्ड मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना ऑक्सिजनचा अपव्यय होणार नाही. याबाबत सूचना दिल्या यावेळी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी कुमार तुपकरी, तंत्रज्ञ टी.पी .काळे यांच्या समवेत इतर डॉक्टर होते.तसेच कमलनयन बजाज रुग्णालय येथील ऑक्सिजन प्लांट मध्ये ऑक्सिजनचा कशा पद्धतीने पुरवठा केला जातो याची पाहणी केली. यानंतर या रुग्णालयातील कोविड वार्डची पाहणी केली. याप्रसंगी डॉ. नताशा वर्मा मुख्य प्रशासकीय अधिकारी तसेच मिलिंद वैष्णव मेडिकल डायरेक्टर हे सोबत होते. ऑक्सिजन वाया न घालवता व्यवस्थितपणे वापर करावा अशा सूचना दिल्या.
या तिन्ही रुग्णालयाच्या ऑक्सीजन प्लांट पाहणी केली असता यावेळी एमजीएम रुग्णालयात 550 ऑक्सीजन बेड पैकी 186 रिक्त आहेत ,हेडगेवार रुग्णालयात 72 पैकी 10 ऑक्सीजन बेड रिक्त आहे व कमलनयन बजाज रुग्णालयात 125 ऑक्सीजन बेड पैकी 25 बेड रिक्त असल्याची माहिती मिळाली. तसेच ज्या ठिकाणी रुग्णाला ऑक्सिजन बेडची आवश्यकता नाही परंतु रुग्ण त्या ऑक्सीजन बेडवर उपचार घेत असेल तर त्याला सामान्य वार्ड मध्ये शिफ्ट करावे, ऑक्सीजन बेडवर असलेला रुग्ण जेवण करताना किंवा टॉयलेटला गेला असताना ऑक्सीजन चालु राहतो त्यामुळे ऑक्सीजन वाया जातो म्हणून ऑक्सीजन कॉक बंद केला पाहिजे अशा सूचना डॉक्टरांना दिल्या तसेच ऑक्सीजन प्लांट मध्ये मेंटेनन्स करण्यासाठी व काळजी घेण्यासाठी तत्काळ तंत्रज्ञांची नियुक्ती करावी अशा सूचना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.