मुंबई : दीदींच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे. तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये. लता दिदींच स्मारक शिवाजी पार्क येथे बनाव अशी मंगेशकर कुटुंबाची इच्छा नाही, लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून सुरू असलेल्या वादावर हृदयनाथ मंगेशकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ह्रदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली आहे. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन लता दीदींना दिले होते. या संदर्भात स्वत: लतादीदींनी सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही विनंती मान्य करून त्या संदर्भात पूर्वतयारी केलेली आहे. दीदींचे संगीत स्मारक तयार होत आहेत यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.