गंगाधर सुरळकर
ग्रामीण प्रतिनिधी तरोडा कसबा
आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 23 /06/ 2021 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बुद्रुक अंतर्गत आरोग्य उपकेंद्र तरोडा कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वय 18 ते पुढील वयोगटातील सर्व पात्र लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला असून तरोडा कसबा येथे कार्यक्षेत्रात परप्रांतातून आलेले मजूर, टोल नाका कामगार व हायवेवरील ब्रिज कामगारांना लसीकरणाचा लाभ देऊन covid-19 आजाराबाबत जनजागृती व आरोग्य शिक्षण दिले ग्रामपंचायत तरोडा कसबा येथील सरपंच राहुल लहाने व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते लसीकरणात डाबेराव सिस्टर तसेच आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच उपकेंद्राचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भांगे यांनी सर्वांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन केले गावातील वयोगट 18 ते 45 असलेल्या व्यक्तींनी लसीकरण मोहिमेत भरपूर प्रतिसाद दिला










