पोलीस प्रशासन व महसूल प्रशासना ची उडाली तारांबळ
अशा अचानक केलेल्या धाळीमुळे पातूर शहरात बनला चर्चेचा विषय
किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर अकोला जिल्ह्यात ठिक ठिकाणी अवैध धंदे गुटका वरली विनापरवाना दारू विक्री अशा विविध प्रकारचे चालत असलेले धंदे विषयी पालक मंत्री ना बच्चू कडू यांनी स्वतः युसुफ, अकबर अशा वेगवेगळ्या नावाने अवैध धंदे वाल्याना घुटके मागत , तसेच स्वस्त धान्य दुकानदारांना शिल्लक रक्कम देऊन धान्य मागून बघितले असता व पातुर तहसील च्या कर्मचाऱ्यांना नवीन राशन कार्ड लाच चे आमिश देऊन मागितली असता काही चांगले तर काही वाईट प्रकार समोर आल्याचे पालकमंत्री ना बच्चू कडू बोलत होते तर साप्ताहिक अधिकार नामा चे प्रतिनिधींनी किरण कुमार निमकंडे यांनी पातुर शहरातील निर्मल पेय जल योजनेबाबत व त्याकरिता वापरलेल्या रस्त्या चे डाग डुगी करण विषयी प्रश्न विचारले असता संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर घेऊन त्वरित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्या करिता कामकाज सुरू करण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी नगर परिषद मुख्य अधिकारी सोनाली यादव यांना दिले आहेत तर पत्रकार प्रदीप काळपांडे यांनी ग्रामीण रुग्णालयाचा जागेच्या येत असलेल्या अडचणी बद्दल पालकमंत्री बच्चू कडू यांना माहिती दिली व पातूर शहरातील काही अवैद्य गुटका विक्री व्यवसाय धारकांन वर अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 नुसार कलम 188,272,273, 26(2),(4), 59 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एकंदरीत 20 हजार रुपयांचा गुटख्याचा माल जप्त करण्यात आला आहे या वेळी पातुर तहसीलदार दीपक बाजड, नायब तहसीलदार खेडकर, पातुर ठाणेदार अमोल गोरे, ट्राफिक पोलीस सोमेश वर्मा, व इतर पोलीस व महसूल संबंधित अधिकारी उपस्थित होते व या अचानक केलेल्या धाळीमुळे पातूर शहरातील मराठी पत्रकार संघाचे अधिकारी व पत्रकारांनी पालकमंत्री ना बच्चू कडू यांचे केलेल्या कारवाईबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले