बचाव व पाठीशी घालणाऱ्यांही सहआरोपी करा
पत्रकार परिषदेत आ.धर्मराव बाबा आत्राम यांची मागणी
अन्यथा विधानसभेत आवाज उचलण्याचा दिला इशारा
आलापल्ली येथील अश्लील चित्रफीत प्रकरण
राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी:- ‘ग्राम पंचायत आलापल्ली’ या व्हाट्सअप ग्रुपवर संतोष मंथनवार नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी 10 जून रोजी सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी तब्बल आठ अश्लील चित्रफीत पोस्ट केले. ग्रुप मध्ये प्रामुख्याने महिला भगिनी सुद्धा आहेत हे प्रकरण गंभीर व अशोभनीय असून सामाजिक वातावरण खराब करण्याचा आहे. गंभीर प्रकरणात अद्यापही कोणतेही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसल्याने संतोष मंथनवार यांना सेवेतून बडतर्फ करून तात्काळ अटक व कठोर कार्यवाहीची तीव्र मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी शनिवारी 19 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन केले.
पत्रकार परिषदेत आ. धर्मराव आत्राम यांनी, असल्या घाणेरड्या व विकृती प्रकरणात संतोष मंथनवार यांचा बचाव करण्यासाठी त्यांचे काही हितचिंतक व मित्रमंडळी सुद्धा प्रयत्न व धडपड करीत असल्याचे आरोप करून त्यांचीही कसून चौकशी करून सहआरोपी करा अशीही मागणी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केले. संतोष मंथनवार यांना सेवेतून बडतर्फ करून तात्काळ अटक व कठोर कार्यवाही न झाल्यास विधानसभेत आवाज उचलण्याचाही गंभीर ईशारा यावेळी आ.धर्मराव आत्राम यांनी दिला. उल्लेखनीय म्हणजे या आधी म्हणजे 11 जून रोजी आलापल्ली येथील इरफान शेख नामक युवकाने सुद्धा अश्लील चित्रफीत पोस्ट केल्याप्रकरणी अहेरी पोलीस स्टेशन येथे मंथनवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन पाठविले आहे. शनिवारी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी पत्रकार परिषद घेऊन मंथनवार यांना सेवेतून बडतर्फ व अटकेची तीव्र मागणी केल्याने ‘ग्राम पंचायत आलापल्ली’ व्हॅटसअप ग्रुप वरील अश्लील चित्रफीत पोस्ट प्रकरणाच्या कार्यवाहीकडे सर्वांचे नजर लागले आहे.