अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
कोरोना काळामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी मध्ये धावून जाऊन हनवत खेडा येथील गोपाल पाटील राऊत यांच्या वतीने मातोश्री बहुउद्देशीय बचत गटातील शेतकऱ्यांना सहाशे बॅग डीएपी खताचा वाटप करण्यात आला ना नफा ना तोटा या तत्त्वावर गोपाल पाटील राऊत यांनी 90 टक्के मागासवर्गीय गावांमध्ये सहाशे बॅग डीएपी खताचा वाटप करण्यात आला त्याची किंमत सात लक्ष वीस हजार रुपये असून ना नफा ना तोटा या तत्त्वावर गोपाल पाटील राऊत यांनी गावांमध्ये खताचे वाटप केले आत्ता पेरणीसाठी शेतकऱ्यांना खताचा वाटप करून त्यांच्याकडून सोयाबीन निघाल्यानंतर त्यांनी बचत गटाकडे आपल्या खताचे पैसे जमा करायचे आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे शिल्लक पैसे लागणार नाहीत त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंद झाला असून कोरोना काळात शेतकऱ्याचे फार नुकसान झाले असून आज शेतकऱ्याला कोणी आधार द्यायला तयार नाही त्यामुळे गोपाल पाटील राऊत यांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपल्या स्वतःच्या आर्थिक कमाई मधून ना नफा ना तोटा या तत्त्वावर हनवत खेडा येथील शेतकऱ्यांना सात लक्ष वीस हजार रुपयाचे सहाशे बॅग डीएपी खताचे वाटप आज हनवत खेडा येथे करण्यात आला याप्रसंगी श्री विठ्ठल कृषी सेवा केंद्राचे संचालक अशोकराव पांडुरंग नवघरे व कृषी विभागाचे मापारी साहेब व इतर कर्मचारी हजर होते गावातील सरपंच सुनील पाटील राऊत ग्रामपंचायत कर्मचारी संजय भगत अरुण रहाणे उमेश राऊत शुभम राऊत माणिकराव राऊत सदाशिव टाले राजाराम वानखेडे विष्णू भगत बनसा बाई भगत रवी भगत सदाशिव चाले अशा असंख्य कास्तकारांची उपस्थिती होती याप्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने गोपाल पाटील राऊत व कृषी सेवा केंद्राचे संचालक अशोकराव नवघरे यांचे आभार मानण्यात आले असून याप्रसंगी शेतकऱ्याच्या चेहर्यावर आनंद झळकत होता अतिशय अडचणीच्या काळामध्ये कोरोना ची परिस्थिती असताना शेतकरी अडचणीत असताना गोपाल पाटील राऊत यांनी राबवलेल्या उपक्रमाची तालुक्यात व परिसरात चर्चा होत असून याचा आदर्श इतर गावांनी घ्यावा असे आवाहन कृषी सहाय्यक मापारी यांनी केले.











