गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 22 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला झेंडावंदन व राष्ट्रगीत करून विविध कार्यक्रम तेल्हारा तालुका व शहरात साजरे करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष प्रा.प्रदिप ढोले सर , शहर अध्यक्ष मोहम्मद सलीम, युवक तालुका अध्यक्ष गणेश कुकडे, महिला तालुका अध्यक्ष वर्षाताई पारस्कर, महिला शहर अध्यक्ष श्रद्धा गढे, महिला जिल्हा महासचिव मनीषा देशमुख, वाडेकर मॅडम, डॉ.वाकोडे मँडम,संतोष छांगाणी, डॉ.खडसे,प्रशांत गेबड सर, कोरपे सर, रावसाहेब फुंडकर, डॉ. जायले, संजय पार्थीकर ,हर्षल ठोकणे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तेल्हारा तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले सर यांनी केले तर आभार तेल्हारा शहर अध्यक्ष मोहम्मद सलीम यांनी मानले