गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:- तेल्हारा येथील शहरातील विश्रामगृह जवळील ज्ञानेश्वरी शिवभोजन येथे शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांकडून तक्रारी शिवसेना पदाधिकारी यांच्या कडे प्राप्त होत असल्याने
याबाबत तहसीलदार यांनी नायब तहसीलदार सुरवडकर यांचे समिती पंचनामा करिता पाठवली असतात सदर शिवभोजन केंद्रावर शिळे भोजन दिल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे गोरगरिबांच्या साठी सरकार राबवत असलेल्या या योजनेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे .
तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन विश्राम गृहाजवळ तेल्हारा प्रो प्रा प्रमोद भटकर यांचे शिवभोजन असून यांच्या कडील शिवभोजन केंद्रावर भोजन अत्यंत निकुष्ठ दर्जाचे असल्याबाबत तक्रारी नागरिकांकडून लेखी स्वरूपात प्राप्त झाल्या आहेत. आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी शिवाजी गजानन फोकमारे शिवभोजन घेतलें असता सदर भोजन हे शिळे दिले आहे याबाबत रीतसर लेखी तक्रार यांनी केली आहे सदर प्रकरणाची दखल घेत आपल्या कार्यालय मार्फत पंचनामा झाला असून सदर पंचनामा नुसार शिवाजी फोकमारे यांना दिलेले शिवभोजन शिळे व निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचनामा वेळी नायब तहसीलदार सुरवडकर, पत्रकार नाना इंगोले, लाभार्थी शिवाजी फोकमारे युवासेना जिल्हा प्रवक्ते प्रा .सचिन थाटे ,आकाश इंगळे ,उपस्थित होते
या आधीसुद्धा अनेक शिक्षणासाठी बाहेर गावाच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले शिवभोजन सुद्धा शिळे असल्याबाबत तक्रारी विद्यार्थ्यांनी केले होत्या.त्यामुळे सदर शिवभोजन केंद्र सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे ही बाब अत्यन्त गंभीर असून त्वरित या केंद्रावर कार्यवाही करावी अशी मागणी तेल्हारा शहरातील नागरिक करीत आहे . याबाबत तरी याबाबत आपण त्वरित शिवभोजन केंद्र परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठवण्यात यावी अशी मागणी शिवसेना पदाधिकारी यांनी केली आहे
शिवभोजम केंद्र हे सर्वसामान्य गरजू नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सरकार राबवत आहे पण तेल्हारा शहरातील ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र शिळे भोजन देत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी वरुन पंचनामा मध्ये निष्पन्न झाले आहे त्वरित यांचे केंद्र परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा शिवसेना आंदोलन करणार
प्रा. सचिन थाटे युवासेना प्रवक्ता
ज्ञानेश्वरी शिवभोजन केंद्र येथे शिवभोजन घेतले असता सदर भोजन मला शिळे व निकृष्ठ दर्जाचे दिले याबाबत मी रीतसर तक्रार तहसीलदार यांना केली आहे .सदर शिवभोजन केंद्र येथे नेहमीच शिळे भोजन दिले जाते .यांच्या वर त्वरित कार्यवाही करण्यात यावी
शिवाजी फोकमारे शिवभोजन लाभार्थी