तर धाडस सामाजिक संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष पदी मंगलाताई उल्हास पुंडकर
करामत शाह
तालुका प्रतिनिधी, अकोला
आगर : अकोला तालुक्यातील आगर गाव येथिल श्री.मनिष शिवरतन बुटे यांची अनेक वर्षापासून सामाजिक कामे व गाव विकासासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनामध्ये सहभाग व जातीभेद न करता अनेक गरीब गरजू रुग्णांना मदत करणे. असेच सामाजिक कार्याची दखल घेत त्याची धाडस सामाजिक संघटनेच्या युवा जिल्हाध्यक्ष अकोला पदि निवड करण्यात आली तसेच महीला जिल्हाध्यक्ष पदी मंगला ताइ पुंडकर यांची निवड करण्यात आली आहे.सदर नियुक्ती धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते शरददादा कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ अध्यक्ष रामदादा सुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हाध्यक्ष मा.श्री.शंकरभाऊ घुगरे
यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शाल व श्रीफळ देऊन निवड करण्यात आली यावेळेस धाडस सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मा.श्री.संजू भाऊ बुंदे ,श्री.शरददादा भिमरावजी बुंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिक्षक सेना गजाननभाऊ बुंदे,बाळकृष्णभाऊ बुटे, पूर्णजी खोडके, प्रविनभाऊ फुकट, श्यामभाऊ ठाकूर (राणा) निलेश घुगरे,अभी भांडे,राहुल वायधने ,योगेश श्रीनाथ, पवन धारपवार कुणाल घुगरे आणि मित्रमंडळी उपस्थित होते.कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








