संजय डोंगरे
ग्रामीण प्रतिनिधी माना
मूर्तिजापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची पाचवी यादी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष
प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जाहीर केली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर मतदार संघातून जेव्हा की हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. डॉक्टर सुगत वाघमारे यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणले. तसेच त्यांना समाजसेवेची देखील आवड आहे. तळागाळातील लोकांकरिता जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवित असतात. सामाजिक बांधिलकी जोपासणारे असे डॉक्टर सुगत वाघमारे यांचा जिल्ह्यात परिचय आहे. नेहमी संकटात धावून येणारे व गरजूंना आर्थिक मदत व सामाजिक मदत देणारे निष्ठावंत ते कार्यकर्ते आहेत.
त्यांना वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यामध्ये एकच जल्लोष करण्यात आला. सुगत भाऊंना आपण यंदा निवडूनच आणू असे कार्यकर्त्यांनी याप्रसंगी बोलून दाखविले.








