बिलाल कुरेशी
ग्रामीण प्रतिनिधी कळंब
कळंब : दि.28 शिराढोण कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शरदचंद्र महाविद्यालयात विद्यार्थी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी अध्यक्ष म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. घोलप के जी यांनी बोलताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमितपणे उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणावा असे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. फारूक तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना यशाची गुरुकिल्ली सांगितली विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी तसेच पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन द्यावे जेणेकरून आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याला आपले अस्तित्व टिकवून ठेवता आले पाहिजे याची जाण करून दिली. प्रमुख उपस्थितीमध्ये तेरणा एक्सप्रेसचे वरिष्ठ संपादक नरसिंह खिचडे यांनी विद्यार्थी व पालकांनी आपापली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडणे ही काळाची गरज आहे असे मत मांडले कार्यक्रमा प्रास्ताविक करताना विद्यार्थी पालक मेळाव्याचे समन्वयक डॉ.अमजद अत्तार यांनी गेल्या 23 वर्षापासूनची महाविद्यालयाची वाटचाल व प्रगती यावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन डॉ. शिरमाळे एम बी यांनी व आभार डॉ. आल्टे एस एम यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी परिसरातील विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


