विकास खोब्रागडे
जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
चंद्रपुर /- शिंदेवाही तालुक्यातील नवरगाव उपवनक्षेत्रातील पेंढरी (कोके) या गावाला लागून असलेल्या जंगल परिसरातील दिवान तलावाच्या जवळ तेंदुपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सकाळच्या सुमारास उजेडात आली.मुतक महिलेचे नाव सिताबाई गुलाब चौके (५५वर्ष) असे आहे. पेंढरी,मोठेगाव,केवाडा,गोदेडा, वडसी या गावा लगत असलेल्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांच्या वावर असुन पर्यायी आढळून येतात.या परीसरात पाळीव प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना नित्यनेमाच्या झाल्या आहेत.तामुळे हिंस्र प्राण्याची दहशत या परीसरात नेहमीच सतावत असते.गोरगरीब जनतेसाठी दरवर्षी रोजगाराचे साधन असलेले तेंदुपत्ता संकलनाचे काम सुरू झाले असून जंगल परिसरात तेंदुपत्त्ता संकलनासाठी नागरिक जात असतात.नवरगाव उपवनक्षेत्रातील पेंढरी कोके गावाजवळील जंगल परिसरात तेंदुपत्त्ता संकलनासाठी काही महीला गेल्या होत्या.दिवान तलाव परिसरात तेंदुपत्त्ता संकलन करणाऱ्या सिताबाई गुलाब चौके (५५वर्ष) रा .पेंढरी (कोके) या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती वनविभागाला कळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा ची कारवाई सुरू होती.
वनविभागाने मुतकाच्या कुटूंबाला आर्थिक मदत देवून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.