तर कामठा नगरातील गजानन महाराज सेवेकरानि फराळाचे केले वितरण,
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड येथील मोठ्या विठ्ठल मंदीरात गावातील भक्तांनि आषाढी एकादशीचे औचित्य साधून त्याच्या लाडक्या विठू माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेतला, दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना मास्क व सॅनिटायझर करण्याची व्यवस्था संस्थांनाच्या वतीने करण्यात आली महिला पुरुष भक्तांनी विठ्ठल मंदिरात बऱ्याच दिवसांनंतर दर्शन घेतल्या आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे गावातील जुन्या ग्रामपंचायत जवळ कामठा नगरातील गजानन महाराज सेवेकरानि संध्याकाळी उपासधारकांना फराळाचे वितरण केले, गावात दिवसभर भक्तिमय वातावरण दिसून आले असून प्रत्येक लहान मोठ्यांनी विठ्ठलरुखमाईची कोरोना दूर जाण्यासाठी उपासना आराधना केली,