राजअनिल पोचमपल्लीवार
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
अहेरी – शिवसेनेच्या वतीने 12 जुलै पासून राज्यव्यापी शिवसंपर्क अभियान सुरू असून अहेरी विधानसभेत अहेरी जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या वतीने शिवसंपर्क अभियान तेजीत सुरू आहे.
सोमवार 19 जुलै रोजी अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले असून असंख्य कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश केले. प्रवेश करणाऱ्यामध्ये बोले मल्ला, मोडगा पोशा, आशा गौराम, बापू पानेम, संतोष पानेम,येरय्या व्येंकटी, विनोद येरय्या, प्रकाश येरय्या, पोटी मोडगा, शंकर मोडगा, मूलका कोडी, शंकर कोडी, समय्या कोडी, पूनम गौरारप्पा, गंगुबाई पानेम, बिचू पानेम, सरिता पानेम, व्येंकटी बानुबाई, रमेश बोडेंकी, सीनका येदुला, मनी शंकर आशा, व्यंकटेश मोडगा, शेवता मोडगा, राजूबाई मोडगा, शैलेश पानेम, चंद्रशेखर राऊत, सुजन ओडिला, बोनदुबाई पानेम, मोसम येथील करिमा मडावी, नामदेव मडावी, किरणताई सिडाम, गोपाल भाद्दीवार, सरिता भाद्दीवार आदी व असंख्यानी यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केले. शिवसेना जिल्हा प्रमुख रियाज शेख, अरुण धुर्वे, बिरजू गेडाम, दिलीप सुरपाम, महिला आघाडीचे तुळजा तलांडे, पौर्णिमा इष्टाम या पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे जंगी स्वागत करून अभिनंदन केले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)