किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर येथील कान्होबा स्वंय सहाय्यता महिला बचत गटांचे अध्यक्षा व साने गुरुजी मंडळ, पातुरचे सचिव कु.पल्लवी ज.मांडवगणे उर्फ सौ.पल्लवी विशाल राखोंडे यांची युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंगिकृत नेहरु युवा केंद्र, अकोला व्दारे सन २०२१- २०२२ यावर्षा करिता पातुर तालुक्याकरिता राष्ट्रीय युवा कोर (एन.वाय.सी.) व तालुका युवा समन्वयक म्हणुन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मा.महेशसिंह शेखावत व लेखापाल मा.उदयजी देशमुख यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे व यापुढे पातुर तालुक्यातील गावा गावातील सुशिक्षित बेरोजगार व असंघटित युवा व युवतीचे संगठन करुन गावात युवा मंडळ स्थापन करुन त्यांच्या पर्यंत व गावातील खऱ्या गरजुंपर्यंत विविध शासकीय योजना पोहचवणे व त्यांच्या माध्यमातुन ग्रामविकास करून राष्ट्रीय कार्यात सहभागी करुन घेण्याकरिता त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.