गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील१९ जुलैला होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती च्या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवारी मिळविण्याकरिता भाजप व वंचित मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून यामध्ये भाजप तसेच वंचित मधील उमेदवारी मागणाऱ्या बड्या नेत्यांची तिकिटे कटणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे तर इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार याकरिता कोरोना काळात सुद्धा जनसंपर्क वाढविल्याचे दिसून येत आहे.
ओबीसीच्या आरक्षणावरून दाखल याचिकेनुसार न्यायालयाने जिल्हा परिषद पंचायत समिति मधील ओबीसीच्या सर्वच सदस्यांचे सदस्यत्व रदद् केल्यामुळे तेल्हारा तालुक्यातील तळेगाव जिल्हा परिषद गट दानापूर जिल्हा परिषद गट अडगाव जिल्हा परिषद गट या तीन जिल्हा परिषद गटांमधील सदस्यांचे सदस्य पद रद्द झाले तर हिवरखेड भाग-1, अडगाव बु. , वाडी अदमपूर व भांबेरी या चार पंचायत समितीच्या गणामधील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले त्यामुळे तीन गटाकरिता व चार गणाकरिता पोट निवडणूक होत आहे. निवडणूक जाहीर होताच सदस्यत्व रद्द झालेले व गत निवडणुकीमध्ये पराभूत झालेले उमेदवार यावेळेस पुन्हा उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात असून काही याव्यतिरिक्त अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्याकरिता आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. यामध्ये राजकीय पक्ष ज्यांची उमेदवारी रद्द झाली आशयांना त्यांच्या झालेल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी केलेल्या कामांचे मूल्यमापन पक्षातील कारकर्ते पदाधिकारी यांची राजी नाराजी या सर्व बाबींचा तपशील तपासून त्याअनुसार योग्य उमेदवारांची उमेदवारी निश्चित होणार असल्याचे समजते. मागील निवडणुकी मध्ये पराभूत उमेदवार सुद्धा यावेळेस आपले नशीब पुन्हा आजामावण्या करिता निवडणुकीच्या रिणांगणात उतरण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे तर यासाठी आपआपल्या पक्षात तिकीट मागण्याकरिता जोरदार प्रयत्न करीत आहेत. यामध्ये भाजपा व वंचित आघाडीच्या बड्या नेत्यांचा समावेश असून एनवेळेवर या बड्या नेत्यांची तिकीटे कटण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे तर आपले तिकीट कटू नये या करिता भाजप व वंचित मधील काही स्थानिक कारकर्त्यांना हाताशी धरून वरिष्ठांची मनधरणी करतांना दिसत आहे.तसेच शिवसेना या वेळेस सक्षम उमेदवारा च्या शोधात आहे शिवसेना तालुका प्रमुख विजय मोहोड़ यांच्या निधना मुळे शिवसेनेला सक्षम उमेदवार शोधने कठिन झाले आहे कारण सक्षम नेतृत्वाचा अभाव तालुक्यात दिसून येत आहे तसेच कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस सुद्धा कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यावी त्याकरिता चाचपणी करीत आहेत आघाडी होणार की नाही हे सांगणे कठीण झाले आहे तसेच प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा यावेळेस दमदार उमेदवार देण्याची शक्यता वर्तविली जात आहे . उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी वाडी अदमपूर गणातून श्रीराम इंगळे व रामकृष्ण नागोलकार या दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र दाखल केले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ५ जुलै ही शेवटची तारीख असून उमेदवारांना शनिवार व सोमवार हे दोनच दिवस राहिले आहेत त्यामुळे ५जुलैला शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्याची मोठी गर्दी होणार आहे .










