सतिश मवाळ
प्रतिनिधी मेहकर
मेहकर तालुक्यातील
गोहोगांव दांदडे ते कऱ्हाळवाडी शेतरस्ताच्या जटील प्रश्न मा.तहिसलदार साहेब यांना दि.8/6/2021रोजी देऊनही आतापर्यंत हा प्रश्न सुटला नाही म्हणुन आज दि.1/7/2021ला मेहकर तहसिल कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले ..
यावेळी संघटनेचे युवानेते मा.भागवत जाधव हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की आज कॄषी दिन असतांना शेतकरी बांधवांना आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी उपोषण करावे लागते..की जे राज्य समस्त शेतकरी बांधवावर अवलंबून आहे ,ज्या राज्यात शेतकरी बांधवांच्या हिताला छत्रपती शिवाजी महाराज,म.ज्योतीरावजी फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राधान्य दिले व ज्या महाराष्ट्रला पुरोगामी चेहरा आहे अश्या महाराष्ट्रात आज हे उपोषण होत आहे याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी जर दखल घेतली नाही तर भविष्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने उग्र आंदोलन करेल…
यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर टाले यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत बोलले की ,हा प्रश्र्न साधा असतांनाच जुन्या फेरफार व तिफन उताऱ्यावर उल्लेख असतांना दोन्ही गटांना एकत्र बसवून हा प्रश्र्न निकाली काढायला पाहिजे होता परंतु प्रशासन तसे करतांना दिसत नाही जर या आंदोलनाची दखल स्थानिक प्रशासन घेत नसेल तर आम्हाला मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात मुक्कामी आंदोलन करावे लागेल याची दखल स्थानिक पातळीवर प्रशासनाने घ्यावी असा इशारा त्यांनी दिला…
ह्या लाक्षणिक उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रफुल देशमुख,अश्फाक भाई ,गणेश धाबे ,सलीम शहा, अफरोज भाई जावेद शहा,दत्ता शेळके,सलीम बिबन शहा, दीपक दांदडे अरविंद दांदडे संतोष भालेराव भुजंगराव दांदळे दिगंबर मुरकुटे शेख राजू शेख जब्बा हा बर शेख भिकन शेख न्यू सिद्धेश्वर बोंद्रे ज्ञानेश्वर दांदडे सुनील दांदडे मिनेश दांदडे भालेराव दिलीप भालेराव राजू कान कटाव गजानन कान कटाव रामेश्वर गव्हाणे ज्ञानेश्वर गव्हाणे शेख रहेमान शेख अब्दुल रामा बोंद्रे सुनील दांदडे पोलीस पाटील सोनू काळे संतोष काळे रमेश काळे संदीप सर जने लुडो स रजने भागवत दांदडे भास्कर दांदडे सुदर्शन काळे गंगाराम मानवतकर आश्रु काळे स्वप्निल काळे दत्तात्रय काळे सह गोहोगांव दांदडे येथील बरीच शेतकरी बांधव व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते…










