गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा गेल्या काही दिवसांनपासून कोविशिल्ड या लसीचा टुटवळा निर्माण झाल्यामुळे ज्यांनी ८४ दिवसापूर्वी कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस घेतला त्यांना आता दूसरा डोस लसीचा तुटवडा असल्यामुळे ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतरही सुद्धा न मिळाल्याने नागरिकांनी २ जुलै ला ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे डॉक्टरांसी या बाबत विचारना करून शासन आमच्या आरोग्याशी खेडत आहे काय असा संतप्त सवाल केला . लसी बाबत शासनाचे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे .
कोरोना वर मात करण्याकरिता लसीकरण हा एकमेव मार्ग प्रभावि असल्याचे शासनाने जाहीर केले व त्यानुसार सर्वत्र लसीकरणाला सुरुवात झाली पहिल्या टप्प्यामध्ये एक महिना ते सव्वा महिन्याच्या आत कोविशिल्ड चा दुसरा डोस दिला जात होता त्यानंतर ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर दुसरा डोस दिला जाईल असे शासनाकडून सांगण्यात आले त्यामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण झाला होता कारण पहिला डोस व दुसऱ्या डोस मधील अंतर सुरूवातीला एक महिना ते सव्वा महिना होते त्यानंतर वाढून ८४ दिवस झाले त्यामुळे निश्चितपणे लसीचा दुसरा डोस हा सव्वा महिन्याच्या आत घेणे योग्य आहे की ८४ दिवस पूर्ण झाल्यावर घेणे योग्य आहे याबाबत सर्वत्र संभ्रम निर्माण झाला शासनाचे ८४ दिवसानंतर डोस देण्याचे जर धोरण व त्याचा लाभ हे जर निश्चित असते तर त्यांनी सव्वा महिन्याच्या आत दुसरा डोस घेतला त्यांना त्याचा फायदा झाला की नाही असा प्रश्न उपस्थित होतो ज्यांना ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर कोविशिल्ड या लसीचा दुसरा डोस न मिळाल्यामुळे त्याचे नागरिकांवर काय परिणाम होणार आहे या सर्व गुंतागुंतीच्या प्रश्नामुळे नागरी संभ्रमावस्थेत असून शासन व्यवस्था नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहे कारण शासनाचे बदललेले धोरण व सध्या स्थितीमध्ये ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवस पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांना दुसरा डोस लसीच्या तुटवड्यामुळे न मिळू शकल्या मुळे त्यांच्यावर काय परिणाम होईल याबाबत शासनाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे याबाबत आज २ जुलैला ग्रामीण रुग्णालय तेल्हारा येथे असंख्य नागरिक कोविशिल्ड चा दुसरा डोस घेण्याकरिता आले असता त्यांना लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी उपस्थित डॉक्टरांशी याबाबत विचारणा केल्या नंतर परत जावे लागले तरी याबाबत शासन किती संवेदनशील आहे हे सुद्धा दिसून आले आहे ज्यांना कोविशिल्ड चा दुसरा डोस मिळाला नाही त्या नागरिकांबद्दल आता पुढे शासन काय निर्णय घेते त्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे शासनाने नागरिकांच्या आरोग्यशी खेळने बंद करावे
लसीकरणाबाबत शासनाचे पूर्णपणे नियोजन कोलमडले असल्यामुळे व कुठल्याही प्रकारची सुसूत्रता नसल्यामुळे नागरिक पहिल्या व दुसऱ्या डोस मधील लसीच्या अंतर बाबत संभ्रमावस्थेत आहेत मुदत संपल्या नंतर ही दूसरा डोस न मिळाल्याने शासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेड़ने बंद करावे अन्यथा नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही
रामभाऊ फाटकर
अध्यक्ष तेल्हारा विकास मंच
कोविशिल्डची लस दोन दिवसाच्या आत उपलब्ध होणार असून या लसीचा दूसरा डोस हा ८४ ते ११२ दिवसाच्या आत घेतला तर चालते तसेच कोव्हक्सिनचा दूसरा डोस हा २८ ते ४२ दिवसाच्या आत घेतला तरी चालते नागरिकांनी संभ्रम न ठेवता ज्यांनी ज्यांनी लस घेतली नसेल त्या सर्व अठरा वर्षावरील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे या काही दिवसातच दोन्ही लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे.
डॉ. अशोक तापड़िया
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय तेल्हारा