हिंगणघाट : तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडितेच्या मामेभावाने केला असल्याचे उघड झाले आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात राहणाऱ्या मामेभावाने अत्याचार केला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आले आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीचा मामेभाऊ तिच्याच घरी राहत होता. मामेभावाने कधी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे घरच्यांना कळलेच नाही. मात्र, मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांच्या उपचारानंतर ही पीडित मुलगी तीन महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस येतास डॉक्टरांनी पीडितेच्या आई वडिलांना संपूर्ण माहिती दिली.
घटनेचा गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी हिंगणघाट पोलिसांना देखील माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करीत आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्या अंतर्गत (पास्को) गुन्हा दाखल केला आहेत. तरी, सादर आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पास्को सेलच्या पोलिस उपनिरीक्षक धनश्री कुटेमाटे करीत आहे.