अजिंक्य मेडशीकर
मालेगांव तालुका प्रतिनिधी
मालेगाव तालुक्यातील भौरद येथे कोरोणाची दुसरी लाट मध्ये काही कुटुंबातील व्यक्ती कोरोणा ग्रस्त झाले होते. त्या मध्ये घरातील करत्या व्यक्ती ला कोरोणाची लागण झाल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थिती निर्माण झाली होती.तर माजी सभापती शे. गणीभाई मित्र मंडळ तथा बळीराजा मात्र मंडळ तसेच पंचायत समिती सदस्या श्रीमती कौशल्याबाई रामभाऊ साठे मेडशी यांच्या वतीने दि. ६ रविवारी रोजी भौरद येथील कोरोणा ग्रस्त कुटुंबानां अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले.या मध्ये एकुन पन्नास ग्रामस्थांना अन्नधान्य ची किटचे वाटप करण्यात आले.या वेळी माजी सभापती शे. गणीभाई, पंचायत समिती सदस्या श्रीमती कौशल्याबाई रामभाऊ साठे, गणपतराव नपते ( सरपंच), तंन्टामुक अध्यक्ष ज्ञानदेव साठे, शौकत पठाण, पोलीस पाटील कैलास नपते, आत्माराम गाढे, भरत नपते, रामचंद्र जाटाळे, वसंता जटाळे, डॉ सुभाष मंत्री, रमजान गौरे, संजय भागवत, जगदीश राठोड, अमोल तायडे, सुभाष तायडे या वेळी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)