अकोला,दि.18(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.17) दिवसभरात झालेल्या 271 चाचण्या झाल्या त्यात शून्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे तीन, अकोट येथे नऊ, मूर्तिजापूर येथे पाच, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील 192, वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील 51, हेगडेवार येथे 11 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर असे 271 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शून्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.