शिवाजी चौगुले
तालुका प्रतिनिधी कागल
कागल : तालुका शस्त्रक्रिया गटात सर्वाधिक ६७६ शस्त्रक्रिया करून गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल जागतिक आरोग्य दिनानिमित्त सोमवारी 07 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन रुग्णालयाचा गौरव करण्यात येणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व शल्यविशारद डॉ. चंद्रकांत खोत, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. जीवन पाटील, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. चेतन शिखरे, भूलतज्ज्ञ डॉ. स्वाती पाटील, डॉ. देविका कुपेकर, डॉ. महेश खवरे यांनी या शस्त्रक्रिया केल्या.


