अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ.सपना राऊत यांची बाळापूर विधानसभा महिला अध्यक्ष पदी नियुक्ती झाली असून ही नियुक्ती जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गावंडे व पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी ,माजी आमदार तुकाराम बिडकर,प्रदेश संघटक कृष्णा अंधारे, माजी आमदार हरिभाऊ भदे,पातूर माजी न. प. अध्यक्ष, गटनेते हिदायत खा रुम खा, श्रीकांत दादा पाटील,बाळापूर चे माजी आमदार बळीराम सिरस्कार तसेच महिला जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई राऊत, श्री.उजवणे, कांबळे,राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या उपस्थितीत रेस्ट हाऊस अकोला येथे करण्यात आली आहे.पातूर शहरातील धडाडीचे नेतृत्व, कार्यकुशल व्यक्तिमत्व असलेले नेहमीच समाजामध्ये सामाजिक उपक्रमांचे आयोजन करित असतात. सामाजिक कामाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी सातत्याने करत राहायचे हे त्यांचे ध्येय आहे.‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी’ पक्षाला तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम राऊत करतील.पक्षाची ध्येय- धोरणे, स्वाभिमानी विचार जनसामान्यात पोहोचविण्यात तसेच पक्ष संघटन वाढविण्यात सौ.सपनाताई राऊत नक्कीच करतील.संपूर्ण कार्यक्रम हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर करून करण्यात आला.