समीर शेख ग्रामीण प्रतिनिधी,अहमदनगर
शेवगाव-तालुक्यातील अमरापुर येथील मुसा भाई टेलर यांची जेष्ठ कन्या कु.नाजमिन मुसा शेख हिने अहमदनगर जिल्ह्यात उर्दु मिडीयम मध्ये ९२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने 2024 चा दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एम. आर. यु. उर्दू विद्यालय शेवगाव ने यावर्षीही निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. अनेक वर्षांपासून इयत्ता बारावी व दहावीच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण ५४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यातील २३ विद्यार्थी उच्चत्तम व उच्चश्रेणीत उत्तीर्ण झाले. २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर कु. नाजमिन मुसा शेख (अमरापुरकर)हिने अहमदनगर जिल्ह्यात उर्दु मिडीयम मध्ये ९२ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. नाजमिन मुसा शेख ९२ टक्के, कु मदीहा आसिफ सय्यद ८३ टक्के, कु. नाजमिन हबीब शेख ८२ टक्के,उज्वल यश संपादन केल्याबद्दल एम आर यु संस्थेचे संचालक मंडळ तसेच यांसह मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.तसेच जिल्हाभरातून नाजमिन मुसा शेख हिचे सर्वत्र कौतुका बरोबर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.नाजमिन मुसा शेख हिने शाळेसोबतच गावाचेही नाव जिल्हा स्तरावर नेले आहे.


