अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी : मंडळातील येलो मोझक प्रभावित सर्व शेतकरी बांधवांना तात्काळ पंचनामे करून पंतप्रधान विमा योजने अंतर्गत सर-सकट नुकसान भरपाई देण्यात यावी या करीता मेडशी मधील शेतकरी बांधवानी जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांची मेडशी येथे आकस्मित भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानी मेडशी मधील शेतकरी बांधवांची मन मोकळे पणाने चर्चा करत वाशीम जिल्हा कृषी कार्यालय हे सदैव शेतकर्याच्या पाठीशी आहे काळजी करू नका म्हणत गावातील शेतकरी बांधवांना धीर दिला व लवकरात लवकर वरिष्ठांशी चर्चा करून पंतप्रधान विमा योजने अंतर्गत येलो मोझक बाधित क्षेत्रातील सर्वांना नुकसान भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे पण यावेळी त्यांनी बोलताना म्हटले. या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शहा यांच्या सह प्रकल्प संचालिका कु.अनिसा महाबळे,जिल्हा कृषि अधिकारी गणेश गिरी, कृषि सहायक डी के रणवीर सह गावातील शेतकरी उल्हास मेडशीकर,जिना गौरे,उस्मान भाऊ,रमजान रेघिवाले, अजिंक्य मेडशीकर सह गावातील अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.