अकाेला : साेमवारी १७ ऑक्टाेबरला झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या नविडणुकीत जिल्हा परिषदेत सत्ता कायम ठेवण्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले. या नविडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्याला पराभवाचा समना करावा लागला. ‘वंचित’च्या उमेदवारांना २५ तर पराजय झालेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना २३ मतांवर समाधान मानावे लागले. अध्यक्षपदी ‘वंचित’ च्या संगीता अढाऊ आणि उपाध्यपदाच्या निवडणुकीत सुनील फाटकर वजियी झाले. भाजप मतदान प्रक्रियेपासून लांबच राहिल्याने ‘वंचित’च्य वजियाचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. वजियानंतर ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लाेष केला.
गत दाेन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही व्यवस्थित रणनीती आखत जि.प.वर झेंडा फडकवण्यात ‘वंचित’ला आतापर्यंत यशच आले. हेच साेमवारी उर्वरित अडीच वर्षांसाठी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही दिसून आले. अध्यक्षपदासाठी ‘वंचित’कडून संगीता अढाऊ व उपाध्यक्षपदासाठी सुनील फाटकर यांनी अर्ज भरले.
जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सकाळी ११ वाजता प्रारंभ झाला. ‘वंचित’कडून अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नावे अंतिम केल्यानंतर अध्यक्षपदासाठी ‘वंचित’च्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बुद्रूक सर्कलचे प्रतनिधित्व करीत असलेल्या संगीता अढाऊ यांनी तर उपाध्यक्षपदासाठी पातूर तालुक्यातील शिर्ला सर्कलचे सुनील फाटकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांंच्या विराेधात राकाँच्या किरण अवताडे व उपाध्यक्षपदासाठी अपक्ष सम्राट डोंगरदविे व शविसेनेचे गोपाल दातकर यांनी अर्ज दाखल केले.
सर्वात अखेरीस राकाँ, शविसेना, अपक्ष व प्रहारचे सदस्य सभागृहात आले. दुपारी तीन वाजता प्रत्यक्ष नविडणुकीची प्रक्रिया प्रारंभ झाली. मात्र अखेरपर्यंत भाजपचे 5 सदस्य सभागृहात पाेहाेचलेच नाहीत. दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास हात उंचावून मतदानाची प्रक्रिया झाली.
जि.प.च्या आवारात सर्वप्रथम ‘वंचित’चे २५ सदस्य दुपारी २.३७ वाजता आले. त्यांनी एकाच मनििटातच सभागृहात प्रवेश केला. वंचित’नंतर कॉंग्रेस सदस्य नविडणूकस्थळी दाखल झाले. विशेष सभेचे छायाचित्रीकरण करण्यात आले असून, नविडणूक प्रक्रियेत सहभाग नाेंदवलेल्या सदस्यांच्या रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
निकालानंतर ‘वंचित’तर्फे पावसातच मिरवणूक काढली. नीळ, गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी केली. या वेळी जिल्हाध्यक्ष प्रमाेद देंडवे ,मिलींद इंगळे, दनिकरराव खंडारे, गजानन गवई, प्रतिभा भाेजने, सावित्री राठाेड, आकाश सिरसाट, पंजाबराव वडाळ, ज्ञानेश्वर सुलताने, सदस्य रामकुमार गव्हाणकर, सुशांत बाेर्डे, अवनिाश खंडारे, अरुंद्धती सिरसाट, प्रतिभा अवचार, प्रभा सिरसाट, पराग गवई, विकास सदांशवि, बबलू सिरसाट, सागर सिरसाट उपस्थित हाेते. वजियासाठी पडद्यामागून अनेक नेते सक्रिय हाेते. यात प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, अॅड. संताेष रहाटे, सिद्धार्थ सिरसाट आदींचा समावेश हाेता.